बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थिती, रोजगार हमी योजना आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनासोबत केलेल्या पाठपुराव्याबद्दल माहिती दिली. पाच हजार रुपये नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने प्रशासनाकडे नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा
विकासकामांचा आढावा घेताना सुप्रिया सुळे यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. रोजगार हमी योजनेच्या कामांबाबतही त्यांनी प्रशासनासोबत चर्चा केल्याची माहिती दिली. नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने प्रशासनाकडे नोंद करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अपघाताच्या चौकशीबाबत भूमिका
राजकीय विषयांवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांनी नुकत्याच केलेल्या मफलर मॅन आणि दादांच्या अपघातासंदर्भातील विधानांवर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, मी रोहित पवारांशी बोलणार आहे, कारण हा विषय अस्वस्थ करणारा आहे. कालच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नसतानाही, त्यांनी आजच्या वर्तमानपत्रातील बातमी वाचली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अपघाताच्या पारदर्शक आणि वेळेत चौकशीची मागणी केली असून, या चौकशी अहवालाची वाट पाहावी, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. चौकशीसाठी योग्य प्राधिकरण निर्णय घेईल, असेही त्यांनी नमूद केले.
Leave a Reply