संजय राऊत यांच्याशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ८ डिसेंबर रोजी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने राऊत यांना मनापासून माफी मागण्याचा सल्ला दिला.
कोर्टाचे निरीक्षण
कोर्टाने राऊत यांना एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि उत्कृष्ट संसदपटू संबोधले. त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने अपेक्षित नसल्याचे कोर्टाने म्हटले. याप्रकरणातील युक्तिवादादरम्यान ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वकिलांनी त्यांच्यातर्फे बिनशर्त माफी मागितल्याचे सांगितले. तर संजय राऊत यांच्या वकिलांनीही माफी मागितल्याचे कोर्टाला सांगितले. मात्र सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने अशा विधानांची दखल घेण्याची मागणी केली.
उपस्थितीतून सूट देण्याची विनंती फेटाळली
दरम्यान, संजय राऊत यांच्या वकिलांनी त्यांच्या हृदयाच्या आणि कर्करोगाच्या आजाराचे कारण देत ८ डिसेंबरच्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थितीमधून सूट देण्याची विनंती केली. मात्र कोर्टाने ही विनंती फेटाळून लावली. या प्रकरणामध्ये संजय राऊत आणि निखिल वागळे या दोघांनाही ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे सक्त निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
Leave a Reply