आर्य चाणक्य हे महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कूटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात माणसाने आयुष्य कसे जगावे याचे सार सांगितले आहे. चाणक्य यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात की, जगात अशी काही माणसे असतात, ज्यांना झोपलेले असताना कधीही झोपेतून उठवण्याची चूक करू नये.
राजा, लहान मूल आणि सिंह
चाणक्य यांच्या मते, राजा झोपलेला असेल तर त्याला शांत झोपू द्यावे. राजाला झोपेतून उठवले तर त्याला राग येऊ शकतो आणि रागाच्या भरात तो शिक्षा करू शकतो, कदाचित मृत्यूदंडही देऊ शकतो. त्यामुळे राजाला झोपेतून जागे करण्याची चूक करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
लहान मूल झोपलेले असताना त्याला झोपेतून उठवू नये, असेही चाणक्य म्हणतात. कारण लहान मुलाची झोप पूर्ण झाली नाही तर ते सतत चिडचिड करते आणि त्याला सांभाळण्यात तुमचा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तुमची कामेही होणार नाहीत.
सिंह झोपलेला असेल तर त्याला जागे करण्याची चूक कधीच करू नये, असे चाणक्य यांनी म्हटले आहे. कारण सिंहाला जागे केल्यास मृत्यू निश्चित असल्याचे त्यांच्या शिकवणीत सांगितले आहे.
आजच्या काळातही मार्गदर्शक शिकवण
चाणक्य नीतीतील ही शिकवण झोपेचे महत्त्व अधोरेखित करते. झोप पूर्ण होणे हे आरोग्यासाठी आवश्यक असते, आणि झोपेत असलेल्या व्यक्तीला अचानक उठवणे त्रासदायक ठरू शकते. ही माहिती प्राचीन ग्रंथातील शिकवणीवर आधारित आहे.
Leave a Reply