रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

साताऱ्यात कचऱ्यापासून कोळसा निर्मितीचा प्रस्ताव

सातारा शहर आणि लगतच्या १८ ग्रामपंचायतींमधून रोज सुमारे ६० टन कचरा गोळा होतो. प्रक्रियेविना पडून राहणाऱ्या कचऱ्यापासून कोळसा तयार करण्याचा प्रकल्प विचाराधीन आहे.

साताऱ्यात कचऱ्यापासून कोळसा निर्मितीचा प्रस्ताव

सातारा शहरासह विस्तारित भाग आणि लगतच्या १८ ग्रामपंचायतींमधून संकलित होणाऱ्या कचऱ्यावर पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत प्रक्रिया केली जाते. संकलित कचऱ्यापैकी ४० टक्के कचऱ्यापासून खतनिर्मिती होत असली तरी उर्वरित कचरा प्रक्रियेअभावी तसाच पडून राहतो. अशा पडून राहणाऱ्या कचऱ्यापासून कोळसानिर्मिती करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. यासाठी पालिका प्रशासनाने नुकतीच उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथील एका प्रकल्पाची पाहणी केली.

दररोज ६० टन कचरा, ३४ टन प्रक्रियेविना

सातारा शहरासह विस्तारित भागातील कचरा संकलनासाठी सुमारे ६० हून अधिक घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्यांबरोबरच सार्वजनिक ठिकाणांची सफाई करत तेथील कचऱ्याचे संकलन करण्याचे कामही स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात येते. हा कचरा सोनगाव डेपोत नेत विलगीकरण आणि विघटनासह इतर प्रक्रिया केल्या जातात. सध्या दररोज सुमारे ६० टन कचऱ्याचे संकलन होत असल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. संकलित कचऱ्यापैकी २४ ते २५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करत त्यापासून खतनिर्मिती करण्यात येते. प्रक्रियेविना सुमारे ३४ ते ३५ टन कचरा डेपोत पडून राहतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला प्रचंड मोठी यंत्रणा वापरावी लागते आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा व वेळ यामुळे पालिकेवर मोठा आर्थिक ताण येतो.

गोरखपूर प्रकल्पाची पाहणी

हा ताण कमी करण्यासह प्रक्रियेविना पडून राहणाऱ्या कचऱ्यापासून कोळसा तयार करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचारात आला. यानुसार मुख्याधिकारी विनोद जळक, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियंत्रण अधिकारी दिलीप चिद्रे, सुधीर चव्हाण आणि रोहित माळी यांनी नुकतीच गोरखपूर येथील एका प्रकल्पास भेट देत पाहणी केली. या प्रकल्पात कचऱ्यापासून कोळसा तयार केला जातो. गोरखपूर, वाराणसी आणि हुबळी येथेही कचऱ्यापासून कोळसानिर्मिती करण्यात येते. याठिकाणी तयार झालेला कोळसा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनला विकला जातो. यातून त्या त्या ठिकाणच्या पालिका आणि महापालिकांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. कचऱ्यापासून कोळसानिर्मितीच्या १०० ते १५० टन प्रक्रिया प्रकल्पावर येत्या काळात सर्वसाधारण सभेत चर्चा होईल. हा प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेवर कोणताही बोजा पडणार नसून, संकलित कचऱ्याची संपूर्ण विल्हेवाट लावणे या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे, असे आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी सांगितले. या प्रकल्पाची क्षमता १०० ते १५० टन असून, त्यातून सुमारे ६० टन कोळसानिर्मिती होईल. प्रकल्पाची किंमत सुमारे ५० ते ६० कोटी रुपये आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance