क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती आणि याअनुषंगीक जनजातीय गौरव दिनानिमित्त रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी धुळ्यात आदिवासी महिला बचत गटांचा मेळावा आणि विविध शासकीय योजनांतर्गत लाभ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके अध्यक्षस्थानी, तर राज्यमंत्री इंद्रनील नाईक प्रमुख पाहुणे असतील.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे सकाळी साडेअकरा वाजता साक्री रोडलगत श्री संतोषीमाता चौक परिसरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात हा मेळावा होणार आहे.
मेळाव्याचा उद्देश
आदिवासी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबनाला प्रोत्साहन आणि शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. मेळाव्यात आदिवासी महिला बचत गटांच्या सहभागासह विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात येणार आहे.
कोण उपस्थित राहणार
महापौर मायादेवी परदेशी, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार गोवाल पाडवी, विधान परिषद सदस्य अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, सत्यजित तांबे, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, आयुक्त लिना बनसोड, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बेलदार आणि अपर आयुक्त दिनकर पावरा उपस्थित असतील, अशी माहिती प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली.
Leave a Reply