सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मालेगावात वाहतूक कोंडी नित्याची; नागरिक त्रस्त

मालेगावात मोसमपूल चौकात सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. अपुऱ्या पार्किंगमुळे वाहने रस्त्यावर उभी राहतात, हातगाड्यांमुळे रस्ते व्यापले जातात.

मालेगावात वाहतूक कोंडी नित्याची; नागरिक त्रस्त

मालेगाव, ता. १४ : शहरात सणासुदीच्या काळात मोसमपूल चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सातत्याने होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील कापडासह अनेक दालने रस्त्याला लागून आहेत. पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. महानगरपालिकेने वाहतूक नियंत्रणासाठी १५ वॉर्डन बॉय वाहतूक पोलिसांच्या मदतीला दिले, तरी वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही.

सिग्नल यंत्रणा अपयशी, हॉकर्स झोन नाही

पाच वर्षांपूर्वी मोसम चौकात सिग्नल यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती. मात्र, ही यंत्रणा अपयशी ठरली. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. रस्ते मोठे झाले असले तरी व्यावसायिक दुतर्फा हातगाड्या लावतात. किरकोळ व्यावसायिकांसाठी येथे हॉकर्स झोन निश्चित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ठेला व हातगाडी चालक आपल्या सोयीने गाड्या लावतात. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने रस्ते व्यापले जातात. परिणामी पादचाऱ्यांसह दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

सायंकाळी गर्दीच्या ठिकाणी पोलिस वाढवण्याची मागणी

शहराच्या पश्चिम भागात दिवाळी सणामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. यात मोसम चौकात सर्वाधिक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. सटाणा नाका, साठ फुटी रोड, सोमवार बाजार, रावळगाव नाका, डीके चौक या भागात सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होते. कापड बाजारात खरेदीसाठीही गर्दी होत आहे. वाहतूक शाखेने किमान गर्दीच्या ठिकाणी सायंकाळी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance