हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. हे रोप पवित्र असण्याबरोबरच पूजनीयही मानलं जातं. साधारण प्रत्येक हिंदू घरात तुळशीचं रोप आढळून येतं आणि सकाळ-संध्याकाळ त्याची पूजा केली जाते. अशातच स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावणं शुभ की अशुभ, याबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे, हे जाणून घेऊयात.
देवींची कृपा राहते
हिंदू मान्यतेनुसार स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो, तर तुळशीच्या रोपात लक्ष्मी देवीचा वास असतो. त्यामुळे स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावल्यास लाभ मिळण्याची शक्यता असते, असं मानलं जातं. असं केल्याने साधकावर देवी अन्नपूर्णासह लक्ष्मी देवीचीही कृपा राहते, अशी श्रद्धा आहे.
दिशा आणि नियमांची काळजी घ्या
स्वयंपाकघरात उत्तर दिशेला तुळशीचं रोप ठेवल्यास शुभ फळ मिळण्याची शक्यता असते, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. त्याचबरोबर दररोज तुळशीच्या रोपाची पूजा करावी. रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीत जल अर्पण करू नये. तसेच या दिवशी तुळशीची पानं तोडणंही चुकीचं मानलं जातं.
स्वच्छता महत्त्वाची
स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावत असाल तर त्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. तुळशीच्या रोपाजवळ कधीच घाण साचू देऊ नये आणि खरकटी भांडीही रोपाजवळ ठेवू नयेत. या चुकांमुळे घरात वास्तूदोष निर्माण होऊ शकतो, असं मानलं जातं. वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, यातून कोणताही दावा केला जात नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply