गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सोनिया गांधींच्या दाव्यावर अण्णा हजारेंचा पलटवार

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील दाव्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पलटवार केला आहे. जबाबदार व्यक्तीने जबाबदारीनेच बोललं पाहिजे, असा टोला त्यांनी…

सोनिया गांधींच्या दाव्यावर अण्णा हजारेंचा पलटवार

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उल्लेख केला आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा छुपा पाठिंबा होता, असा आरोप सोनिया गांधी यांनी आपल्या ‘बिलाँगिंग: ए जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात केला आहे. सोबतच अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे आपलं सरकार गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यावर आता अण्णा हजारे यांनी प्रतिउत्तर देत सोनिया गांधींच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

अण्णांचा पलटवार

‘जबाबदार व्यक्तीने जबाबदारीनेच बोललं पाहिजे, अन्यथा स्वतःची किंमत कमी होते,’ असा टोला अण्णा हजारे यांनी लगावला आहे. ‘माझा कोणत्याही पक्षासोबत अथवा पार्टीसोबत संबंध नाही. मी जे काही करतो, ते देशहितासाठी आणि समाजाच्या हितासाठी करतो,’ असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं असून हे पुस्तक देशभरात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे.

आणीबाणीवरही दावे

सोनिया गांधी यांनी या पुस्तकात आणीबाणीवरही दावे केले आहेत. आणीबाणी लावण्यावरून इंदिरा गांधींवर नेहमीच टीका होते. मात्र या पुस्तकातून सोनियांनी इंदिरा गांधींची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणीबाणी लागू करण्याचा इंदिरा गांधींचा विचार नव्हता, असा दावा सोनिया गांधींनी पुस्तकातून केला आहे. आणीबाणी लागू करण्याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. राजीव गांधीही आणीबाणीच्या विरोधात होते, मात्र संजय गांधी हे आणीबाणी लावण्याच्या समर्थनात होते, असं त्यांनी म्हटलं आहे.

दानवेंची टीका

दरम्यान, याच मुद्द्यांवर बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही भाष्य करत भाजपवर टीका केली आहे. अण्णा हजारे यांना पुढे करून देशात अराजकता माजवणं हा कट होता, असं दानवे म्हणाले. अण्णा हजारे यांनी नंतर कोणत्याच मुद्द्यावर बोलले नाही, त्यामुळे त्यांच्याकडून कोणीतरी बोलावून घेतलं, हा प्रश्न असल्याचंही ते म्हणाले. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनीही सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance