फेंग शुई हे देखील एक वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईचा उगम चिनमध्ये झाला. मात्र त्यानंतर फेंग शुईचा प्रसार हळूहळू संपूर्ण जगभरात झाला. आज जगातील अनेक देशांमध्ये फेंग शुई शास्त्रामधील उपाय केले जातात. घराला बरकत प्राप्त व्हावी आणि हातात पैसा टिकावा, यासाठी फेंग शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.
अनेकांच्या बाबतीत असे घडते की ते पैसा कमावण्यासाठी प्रचंड मेहनत करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, परंतु तरीही त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. पैसा हातात तर येतो, मात्र कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे तो लगेच खर्च होतो. महिन्याच्या शेवटी अशा लोकांची तिजोरी रिकामी असते. असे घडू नये, हातात पैसा टिकून राहावा, यासाठी फेंग शुईमधील उपायांमुळे घरात सुख आणि समृद्धी येते, गरज नसलेल्या खर्चाला आळा बसतो आणि हातात पैसा टिकून राहतो, अशी मान्यता आहे.
पाकिटात या वस्तू ठेवू नका
अनेकांना आपल्या पाकिटात विविध वस्तू ठेवण्याची सवय असते. त्यामध्ये जुन्या नोटा, जुनी बिले, तसेच चलनात नसलेली नाणी आणि पूर्वजांचे फोटो अशा अनेक वस्तू पाकिटात ठेवल्या जातात. परंतु फेंग शुईनुसार आपल्या पाकिटात कधीही चलनात नसलेली नाणी, फाटलेल्या नोटा किंवा जुनी बिले ठेवू नयेत. त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो आणि परिणामी हातात पैसा टिकत नाही, असे सांगितले जाते.
पैसे ठेवण्याची पद्धतही महत्त्वाची
फेंग शुईनुसार पाकिटात कधीही धारदार वस्तू देखील ठेवू नयेत. पाकिटात पैसा ठेवताना तो नेहमी चढत्या क्रमाने ठेवावा, असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. म्हणजे सगळ्यात आधी दहाची नोट, नंतर शंभरची नोट आणि नंतर पाचशेची नोट या क्रमाने पैसे ठेवावेत. तसेच कोणाकडूनही उसणे दिलेले पैसे घेताना नेहमी उजव्या हातानेच पैसे घ्यावेत, असेही फेंग शुईमध्ये सांगण्यात आले आहे.
(ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल कोणताही दावा केला जात नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा दिला जात नाही.)
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply