परभणी जिल्हा कारागृहात न्यायबंदींसाठी दिवाळी पहाट हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी आणि जिल्हा कारागृह वर्ग-२, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात
रविवारी सकाळी १० वाजता आयोजित या कार्यक्रमातून न्यायबंदींच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासह त्यांच्या मनात सकारात्मक विचार आणि नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर भूपण काळे यांनी उपस्थित न्यायबंदी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कारागृहातही सण-उत्सवाच्या माध्यमातून आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
भजन, भावगीते आणि देशभक्तिपर गीते
कार्यक्रमात संगीतकार डॉ. सुधीर वनशेठीकर, डॉ. सी. बिन्या वनशेठीकर, श्रीराम वाघमारे आणि रंजिता वाघमारे यांनी अभंग, भक्तिगीते, भावगीते, देशभक्तिपर गीते आणि दिवाळी विशेष गीतांचे सादरीकरण केले. या संगीतमय कार्यक्रमामुळे कारागृहातील वातावरण आनंदमय झाले. न्यायबंदींनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी जिल्हा कारागृह वर्ग-२ चे अधीक्षक पांडुरंग भुसारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे तुरुंगाधिकारी गजेंद्र मरळे, उपतुरुंगाधिकारी स्वाती जाधवर यांच्यासह विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी आणि कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply