प्रकृती अस्वस्थतेमुळे शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पवार रुग्णालयात दाखल होताच राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
पटेलांच्या भेटीने चर्चेला तोंड
प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेताच नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. १० तारखेनंतर मुंबईत भेटू, असा संवाद शरद पवार आणि पटेल यांच्यामध्ये झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
शिंदे यांनी दिला दुजोरा
पटेल-पवार यांच्या १० तारखेनंतरच्या भेटीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे या भेटीकडे आणि त्यानंतरच्या घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply