स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य गावागावातील प्रत्येक आदिवासी घरापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजातीय गौरव दिनानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याची कटिबद्धता व्यक्त करण्यात आली.
मुंबईत कार्यशाळा आणि प्रदेश कार्यकारिणीची बैठक
मुंबईतील दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात जनजातीय गौरव दिन कार्यशाळा तसेच अनुसूचित जनजाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी जनजातीय गौरव समितीच्या सहसंयोजक माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी आपले विचार मांडले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सह संघटनमंत्री सतीश धोंड, खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार संजय पुराम, आमदार राजेश पाडवी, जनजाती आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, संतोष जनाटे आणि विरेंद्र शहा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी वीर पुरुषांच्या तसेच भारत मातेच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.
१५ नोव्हेंबर हा जनजातीय गौरव दिन
आदिवासी समाजाची एकजूट उभारत ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे नेतृत्व करणारे बिरसा मुंडा यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकार १५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करणार आहे. त्यांचा शौर्यशाली इतिहास आणि प्रेरणादायी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply