कीर्तन ही महाराष्ट्राची भक्तिपरंपरा आणि लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. मात्र, बदलत्या काळात त्याला प्रसिद्धी, पैसा आणि राजकीय हितसंबंधांची जोड मिळत आहे. याच वास्तवाचा वेध ‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट कीर्तनकार राजलक्ष्मी हिच्या प्रवासातून घेतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये या चित्रपटाचा एक शो आयोजित करण्यात आला होता.
राजलक्ष्मीच्या प्रवासातून कीर्तनाचे बदलते रूप
या चित्रपटात राजलक्ष्मीची भूमिका श्रुती मधुदीप यांनी साकारली आहे. गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिज दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांचे छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांचे संकलन आणि शंतनू-दिनेश यांचे ध्वनी आरेखन आहे. निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिले असून प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केले आहे.
या शोचे आयोजन होल्डिंग हँड बहुद्देशीय संस्थेने सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी केले होते. स्क्रीनिंगला निर्माता-दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे, नायिका श्रुती मधुदीप, अभिनेत्री शलाका गाडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश सिरसीकर, सचिव डॉ. अपर्णा मेहता आणि उपाध्यक्ष रवींद्र बनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply