राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी रास्त भाव मिळण्यासाठी आक्रमक झाले असताना साखर कारखान्यांच्या लुटमारीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखर कारखान्यांकडून उसाच्या वजनात काटामारी होत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या आरोपानुसार, काटामारीतून शेतकऱ्यांची तब्बल २६०० कोटी रुपयांची फसवणूक होत असल्याचं सांगितलं जात आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर डल्ला मारणाऱ्या साखर कारखान्यांच्या या लुटमारीचा पर्दाफाश झाल्याचं सांगितलं जात आहे. कारखान्यांकडून काटामारीतून नेमकी कशी लूट केली जाते आणि एफआरपीच्या दरवाढीपेक्षा ही लूट कशी जास्त आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शेतकरी आधीच आर्थिक कोंडीत
आधीच दुष्काळ, वाढलेला उत्पादन खर्च आणि गाळप हंगामात मिळालेला तुटपुंजा भाव यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत अडकला आहे. त्यातच कारखानदारांच्या या छुप्या लूटमारीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कारखान्यांच्या या कथित लुटीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
कारवाई होणार का?
कारखान्यांच्या लुटीविरोधात साखर आयुक्तालय कारवाई करणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. की कारखान्यांकडून शेतकऱ्यांची अशीच लूटमार सुरूच राहणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
उसाच्या वजनातील काटामारीचा आरोप गंभीर असून, याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. गाळप हंगामात शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शासनाने तातडीने पावलं उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा