डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी तब्बल ५० ते ५२ वर्षे काँग्रेसचा झेंडा विविध ठिकाणी रोवण्याचे काम केले. मात्र, एका दिवसात ते वाईट कसे झाले? त्यांनी एका दिवसात काय दरोडा घातला? त्यांनी तर खऱ्याला खरं म्हटलं. मग आता काहींची अडचण का होत आहे? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
पाटील यांचा सवाल काय?
डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी तब्बल पन्नास-बावन्न वर्षे काँग्रेसचा झेंडा विविध ठिकाणी रोवण्याचे काम केले. असे असताना एका दिवसात ते वाईट कसे झाले? त्यांनी तर खऱ्याला खरं म्हटलं आहे. मात्र, आता काहींची अडचण होणार आहे, असे पाटील म्हणाले. शरद पवार यांच्याविषयीच्या बदललेल्या राजकीय भूमिकांवर त्यांनी यावेळी भाष्य केले.
राऊतांवर निशाणा आणि सुळेंचे कौतुक
संजय राऊत यांच्यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, संजय राऊत यांचे राजकारण शरद पवार यांच्याशिवाय चालत नव्हते, असे म्हटले जाते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात जे घडले, ते शरद पवार आणि संजय राऊत यांच्या माध्यमातून घडविण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, आता तेच संजय राऊत शरद पवार यांच्याविषयी बोलणार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकाराला दिलेल्या प्रत्युत्तराचे पाटील यांनी कौतुक केले. संबंधित पत्रकाराचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी, ‘मी कोणाच्या बापाची मुलगी आहे, हे तुम्हाला माहिती आहे,’ असे ठणकावून सांगितले. तसेच, ‘अशा पत्रकाराला भीक घालत नाही,’ अशी भूमिका मांडल्याचा उल्लेख पाटील यांनी केला. सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनाच लक्ष्य केले असल्याचा संदर्भ देत पाटील यांनी त्यांच्या या ठाम भूमिकेचे कौतुक केले. डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना शरद पवार, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या संदर्भाने चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा