, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रेशन कार्ड हरवलं? मोबाईलवरून असं काढा डुप्लिकेट कार्ड

रेशन कार्ड हरवलं किंवा फाटलं असेल, तर काळजी करू नका. डुप्लिकेट रेशन कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सहज काढता येतं. प्रक्रिया आणि कागदपत्रं जाणून घ्या.

रेशन कार्ड हरवलं? मोबाईलवरून असं काढा डुप्लिकेट कार्ड

मुलांच्या शाळेच्या प्रवेशापासून ते रेशन घेण्यापर्यंत रेशनकार्ड हा महत्त्वाचा पुरावा लागतो. बऱ्याचदा कागदपत्रं महत्त्वाच्या कामासाठी बाहेर नेली जातात आणि ती आणायला विसरलं जातं, म्हणजेच ती कुठेतरी हरवतात. काही वेळा रेशनकार्ड वापरून वापरून जुनं होतं किंवा फाटतं. त्यामुळे पुढील कामं रखडू शकतात. अशा वेळी डुप्लिकेट रेशन कार्ड काढता येतं. त्याची प्रक्रिया खूप सोपी असून ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.

ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा

रेशन कार्ड हरवलं असेल, तर सर्वात आधी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणं गरजेचं आहे. यासाठी एफआयआर दाखल करणं आवश्यक असतं. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयात जा. तिथे डुप्लिकेट रेशनकार्डासाठी अर्ज करा. हा फॉर्म अचूक भरून तिथे नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रं जोडा. त्यामध्ये एफआयआरची प्रत सुद्धा द्यावी लागते. तिथे नमूद केल्याप्रमाणे शुल्क भरावं लागेल. अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसांमध्ये नवीन रेशन कार्ड तयार होईल. ते तुम्ही संबंधित कार्यालयातून मिळवू शकता.

ऑनलाइन पद्धत आणि ई-रेशन कार्ड

तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही डुप्लिकेट रेशनकार्ड काढू शकता. त्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डुप्लिकेट रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करा. त्यावर डिजिटल ई-रेशन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करून वापरता येईल. महत्त्वाच्या कामासाठी हे कार्ड वापरता येतं. यासाठी जास्त दिवसांचा कालावधी लागत नाही.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance