भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सतत चर्चेत असलेलं नाव आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला वगळण्यात आलं. चांगली कामगिरी करूनही संधी मिळाली नसल्याने सिराज नाराज असल्याची चर्चा आहे. नाणेफेकीनंतर सिराज गॉगल लावून इकडे तिकडे बघताना दिसला. यावर माजी भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
पहिल्या कसोटीतही स्थान नाही
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळण्यात आला. त्या सामन्यात सिराजला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं नाही. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये सिराजचा समावेश आहे. तरीही त्याला पहिल्या कसोटीत संधी देण्यात आली नाही.
गिल यांचा निर्णय आणि कार्तिक यांचा सवाल
कर्णधार शुभमन गिल यांनी पुन्हा एकदा सिराजला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी गुरनूर ब्रारला संधी देत कसोटीत पदार्पणाची संधी दिली. सहा वर्षांत सिराजसोबत पहिल्यांदाच असं घडलं. यादरम्यान नाणेफेकीनंतर सिराज गॉगल लावून फिरताना दिसला. तो रडत आहे का, तो भावूक झाला आहे का, असा प्रश्न कार्तिक यांनी उपस्थित केला. काही खेळाडू संघातून वगळल्यानं सहज निर्णय स्वीकारतात. पण काही खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीत खेळायचं असतं. दुखापत झाली तरी त्यांना मैदानात उतरून खेळायचं असतं. त्यांना कशाचीही पर्वा नसते. सिराज त्यापैकीच एक आहे, असे कार्तिक म्हणाले. ऑगस्ट महिन्यात सिराजने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याला अपेक्षित यश यादरम्यान मिळालं नाही.
प्रतिक्रिया व्यक्त करा