मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर कायदेशीर बंदी येणार का, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. रक्ताच्या नात्यात लग्न केल्यास पुढील पिढीच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
अशा विवाहांना आळा घालण्यासाठी कायदा करता येईल का, हा प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर आता संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत.
छोटा पुढारी यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर ‘बिग बॉस’ फेम आणि अभिनेते घनश्याम दराडे, म्हणजेच छोटा पुढारी यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकार म्हणेल तर तरुण पोरांची नसबंदी करून घ्या, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
Leave a Reply