गेल्या काही दिवसांपासून सारा तेंडुलकरच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू होती. तिचा भाऊ अर्जुन याचा लग्नसोहळा नुकताच थाटात पार पडला. त्यानंतर आता सारा लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. सनी देओल यांचा मुलगा राजवीर याच्यासोबत 2027 साली ती लग्न करणार असल्याचीही चर्चा रंगली होती.
लग्नाच्या चर्चेमागचं सत्य काय?
या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. साराच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व चर्चा केवळ अफवा आहेत. सारा आणि राजवीर एकमेकांना कधी प्रत्यक्षात भेटलेही नाहीत, असंही सूत्रांनी सांगितलं. राजवीर साराला महागडी भेटवस्तू पाठवत असल्याचे दावेही खोटे असल्याचं समोर आलं आहे. ही अफवा सुरुवातीला रेडिटवरून पसरल्याचंही सांगितलं जात आहे.
सध्या सारा कशावर लक्ष देतेय?
सारा सध्या एकटी आहे आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. भावाच्या लग्नाचा अनुभव तिच्यासाठी एक चाचणी ठरल्याचं तिने सांगितलं होतं. त्या अनुभवातून आपल्या जोडीदारात कोणते गुण हवे आहेत, हे तिला कळलं असल्याचं तिने म्हटलं होतं.
Leave a Reply