जागतिक स्तरावरील तणावाची परिस्थिती आणि त्याचा सर्वच देशांवर होणारा परिणाम यामुळे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भारतात अन्नधान्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनावर होत आहे.
दररोजच्या थाळीतील आवश्यक गोष्टींच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. डाळी, तांदूळ आणि साखरेच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
सरकारचा निर्णय आणि सर्वसामान्यांवर परिणाम
या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. यावेळीही सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तांदळावर २० टक्के कर लावण्यात आला आहे. या निर्णयाचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply