लग्नसराई सुरू असताना सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. देशात 24 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 12,657 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा 11,601 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा 9,492 रुपये इतका नोंदवला गेला आहे.
दहा ग्रॅमचे दर किती?
प्रति 10 ग्रॅमच्या दराबाबत 24 कॅरेट सोने 1,26,570 रुपये, 22 कॅरेट सोने 1,16,010 रुपये आणि 18 कॅरेट सोने 94,920 रुपये इतके आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,16,010 रुपये असून, सुरतमध्ये तो 1,16,060 रुपये आहे.
चांदीचे दर स्थिर
सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांना 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 1.26 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
Leave a Reply