नोकरीदरम्यान किंवा गरजेच्या वेळी अनेक कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून पैसे काढतात. मात्र ही रक्कम मोठी असेल तर त्याचा बराच मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफमधून निधी काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. नवीन प्रस्तावानुसार कर्मचारी आता त्यांच्या ईपीएफ खात्यातील शिल्लकीच्या ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतील. यापूर्वी ही मर्यादा ७५ टक्के होती.
निवृत्तीवर होणारा परिणाम
नवीन नियमांनुसार मोठी रक्कम काढल्यास निवृत्तीच्या वेळी मोठा फटका बसू शकतो. पीएफमधून ९० टक्के रक्कम काढल्यास निवृत्तीला सुमारे २७ लाखांचा फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नियमांमध्ये प्रस्तावित दोन मोठ्या बदलांचा नेमका परिणाम काय होणार, याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
Leave a Reply