जागतिक परिस्थिती तणावाची असताना सोना-चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी भारतीयांना सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन फायदेशीर ठरले आहे.
सात महिन्यांत 1.53 लाख कोटींची बचत
एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत देशातील सोन्याची आयात मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 40 टक्क्यांनी घटून 24.7 अब्ज डॉलरवर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत भारताने 41.24 अब्ज डॉलर म्हणजेच 3.83 लाख कोटी रुपयांचे सोने आयात केले होते. याचा अर्थ आयातीवरील खर्च 16.46 अब्ज डॉलरने कमी झाला असून, सात महिन्यांत 1.53 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे.
Leave a Reply