मुंबईमध्ये सध्या हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीतील फटाके आणि शहरात सुरू असलेली बांधकामे यामुळे हवेतील प्रदूषण वाढले आहे. त्यातच धूळ, धूर आणि हवेतील सूक्ष्म कण यांमुळे घरातील हवेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ हवा मिळणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे अनेकजण घरासाठी एअर प्युरिफायर खरेदी करण्याचा विचार करत आहेत.
खरेदी करण्यापूर्वी काय लक्षात घ्यावे?
बाजारातून एअर प्युरिफायर खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या घराच्या गरजेनुसार आणि जागेनुसार योग्य उपकरण निवडले तरच त्याचा खरा फायदा मिळतो. त्यामुळे घाई न करता खरेदीपूर्वी आवश्यक माहिती घेणे महत्त्वाचे ठरते.
Leave a Reply