आजकाल कान आणि नाक टोचण्याचा ट्रेंड तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. फॅशन आणि सौंदर्याचा भाग म्हणून अनेकजणी कानात किंवा नाकात पिअर्सिंग करून घेतात. बाजारात पिअर्सिंगचे विविध प्रकारही आले आहेत.
काळजी न घेतल्यास काय होते?
पिअर्सिंग केल्यानंतर योग्य काळजी न घेतल्यास त्या ठिकाणी सूज, लालसरपणा, वेदना किंवा संसर्ग होण्याची शक्यता असते. अनेकांना कान किंवा नाक टोचल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, हे माहीत नसते. त्यामुळे जखम वाढत जाते आणि काही वेळा पिअर्सिंग काढावेही लागू शकते.
योग्य काळजी का महत्त्वाची?
कान कोणत्या धातूने टोचावा, कोणत्या काळात टोचावा आणि टोचल्यानंतर काळजी कशी घ्यावी, याबाबत योग्य माहिती असणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होते.
Leave a Reply