लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवकाश असताना धाराशिव लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेत उमेदवारीचे दावे आणि प्रतिदावे सुरू झाले आहेत. महायुतीतील शिवसेना पक्षात यावरून हमरी-तुमरीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पक्षाने यंदा तिकीट दिल्यास आपण शंभर टक्के खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याचे आव्हान दिले आहे. विद्यमान खासदार शिवसेनेचाच असताना त्यांनी असे वक्तव्य केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
विद्यमान खासदारांचे उत्तर
या विधानावर सध्याचे लोकसभा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विचारपूर्वक प्रतिक्रिया दिली आहे. पक्षातील एकजूट आणि एकवाक्यता काय आहे, हे २०२९ ची निवडणूक लागल्यानंतर दिसून येईल, असे सांगत त्यांनी पक्षातील एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.
मात्र, ज्ञानराज चौगुले यांच्या उमेदवारीच्या इच्छेवर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी मिश्किल टोला लगावला. ‘मला उद्या अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे, मग तुम्ही मला अडवणार का?’ असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.
निर्णय कोण घेणार?
दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीवरून स्पर्धा आतापासूनच जुंपली आहे. आता एकनाथ शिंदे या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ घालतात, हे येणारा काळच ठरवणार आहे.
Leave a Reply