पुण्यात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हेल्थ सप्लिमेंट्स आणि प्रोटीन पावडरच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर कठोर भूमिका मांडली आहे. मसल गेनच्या नावाखाली खोटे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
कोणावर कारवाईचा इशारा
जिम चालक, उत्पादक, विक्रेते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मसल गेनच्या नावाखाली खोटे दावे करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे मुंढे यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.
तपासणी अहवाल लवकर मिळणार
तपासणी अहवालाचा कालावधी ३० दिवसांवरून २० दिवसांवर आणण्यात आला असून तो लवकरच १४ दिवसांवर आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासह इंदू केअर कंपनीवरील कारवाई आणि आरक्षणासंदर्भातील वक्तव्यांवरही मुंढे यांनी भाष्य केले.
Leave a Reply