बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील सातेफळ येथील एका शेतकऱ्याचा पाच एकर ऊस आगीत जळून खाक झाला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विद्युत तारांच्या घर्षणातून आग
शेतात असलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडल्या आणि त्यामुळे उसाला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, त्यात संपूर्ण पाच एकर उसाचा कोळसा झाला.
शेतकरी जखमी; अग्निशमन दल घटनास्थळी
आपल्या डोळ्यादेखत उसाला आग लागल्याचे पाहून शेतकऱ्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत संबंधित शेतकरी जखमी झाला. आगीची माहिती मिळताच केज नगरपंचायतीचे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत संपूर्ण ऊस आगीच्या विळख्यात सापडल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. या घटनेमुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Leave a Reply