मणिपूरमध्ये भेसळयुक्त दारू प्यायल्याने आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील मृतांचा एकूण आकडा १६ वर पोहोचला आहे. ही माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
सुमारे ६०० जणांवर उपचार सुरू
पोलीस महानिरीक्षक थेमथिंग नगाहसांगवा यांनी सांगितले की, १८ नोव्हेंबरपासून चंडेल जिल्ह्यात भेसळयुक्त दारू प्यायल्याने सुमारे ६०० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या सर्वांवर विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
दारू पुरवल्याप्रकरणी सहा जणांना अटक
भेसळयुक्त दारूचा पुरवठा केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून रुग्णालयात दाखल असलेल्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
Leave a Reply