बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदान चाचणीचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राच्या साहाय्याने चाचणी सुरू असताना बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात पकडले. अमडापूर-लव्हाळा मार्गावरील शेतातील पत्र्याच्या गोठ्यात हा प्रकार सुरू होता.
## बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याचे संयुक्त पथक सकाळी सहा वाजल्यापासून संशयितांच्या मागावर होते. बनावट ग्राहकाच्या मदतीने पथकाने गोठ्यात छापा टाकला. यावेळी चाचणी सुरू असतानाच तिघांना पकडण्यात आले.
## तिघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी तिघांवर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार व इतर कलमांखाली अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असून, या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
Leave a Reply