जिममधील सप्लिमेंट विक्रीवर लक्ष
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या सप्लिमेंटकडे लक्ष वळवले आहे. दुधाच्या गुणवत्तेबाबत कठोर कारवाई केल्यानंतर मुंढे यांनी जिम सप्लिमेंटच्या विषयावरही कडक भूमिका घेतली आहे.
जिम किंवा फिटनेस सेंटरमध्ये सप्लिमेंटची विक्री केली जात असेल, तर त्यासाठी परवाना घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परवान्याशिवाय विक्री करता येणार नाही.
दिशाभूल केल्यास दहा लाखांचा दंड
सप्लिमेंटबाबत ग्राहकांची दिशाभूल केल्यास दहा लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल, असा इशारा मुंढे यांनी दिला आहे. सप्लिमेंटच्या नावाखाली चुकीची किंवा फसवी माहिती देणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Leave a Reply