आवळा हा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीसह अनेक पोषक घटक असतात, त्यामुळे आहारात आवळ्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आवळा जास्त दिवस ताजा ठेवणे शक्य नसते. अशावेळी आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
गोड, आंबट आणि रसाळ चवीचा मोरावळा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो. विशेष म्हणजे हा मोरावळा तुम्ही घरीच तयार करून दीर्घकाळ साठवून ठेवू शकता.
तेजश्री डोखे यांची सोपी पद्धत
तेजश्री डोखे यांनी गावठी आवळ्यापासून मोरावळा तयार करण्याची अतिशय सोपी पद्धत दाखवली आहे. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे गावठी आवळ्यापासून घरगुती पद्धतीने मोरावळा तयार करता येतो.
वर्षभर टिकणारा हा मोरावळा घरात तयार करून ठेवल्यास आवळ्याचे पोषक गुण वर्षभर मिळू शकतात. आहारात मोरावळ्याचा समावेश केल्याने चवीसोबतच आरोग्याचाही फायदा होतो, असे मानले जाते.
Leave a Reply