सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील देवळाली गावातील प्रसिद्ध विहीर कोरडी पडली आहे. ‘सैराट’ चित्रपटामुळे ही विहीर महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली होती. ६१ वर्षांनंतर ही विहीर प्रथमच कोरडी पडली आहे.
१९६५ च्या दुष्काळात बांधलेली विहीर
ही ऐतिहासिक विहीर १९६५ च्या दुष्काळात बांधण्यात आली होती. कधीकाळी ही विहीर परिसरातील पिकांसह माणसे आणि जनावरांची तहान भागवत होती. आज मात्र भीषण दुष्काळामुळे ती आटली आहे.
दुष्काळाचे भीषण वास्तव
एकसष्ट वर्षांत प्रथमच विहीर कोरडी पडणे हे दुष्काळाच्या तीव्रतेचे प्रतीक मानले जात आहे. सैराटमुळे महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या या विहिरीची ही अवस्था दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आणते.
Leave a Reply