यूपीआय पेमेंट वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डिजिटल पेमेंटवर आकारल्या जाणाऱ्या मर्चेंट डिस्काउंट रेट अर्थात एमडीआरच्या नियमात बदल होण्याची शक्यता होती. मात्र हा निर्णय तूर्तास पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यूपीआय वापरणाऱ्या लाखो लोकांचे लक्ष आता या निर्णयाकडे लागले आहे.
एमडीआर म्हणजे काय?
आज बहुतांश लोक यूपीआयने पेमेंट करणे पसंत करतात. यामागे वेळेची बचत, रोख रक्कम सोबत ठेवावी न लागणे आणि काही क्षणांत पेमेंट पूर्ण होणे ही कारणे आहेत. तरुणांकडे तर रोख रक्कम मिळणेही कठीण झाले आहे. एमडीआर म्हणजे पेमेंट केल्यावर लागणारे शुल्क. या शुल्काच्या नियमात बदल करण्याचा निर्णय सध्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
निर्णय का लांबणीवर?
मिळालेल्या माहितीनुसार, पाच राज्यांतील २०२७ च्या विधानसभा निवडणुकांनंतरच या विषयावर निर्णय घेतला जाईल. मात्र सरकारकडून याबाबत अजून अधिकृत अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे यूपीआय शुल्काबाबतचा अंतिम निर्णय कधी होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Leave a Reply