पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर प्रणालीतील सुधारणांवर भर दिला आहे. या सुधारणांमुळे करदात्यांना नेमके कोणते फायदे होतात, हे त्यांनी सांगितलं. कॉर्पोरेट कर ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
१२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही
बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होत नाही. या बदलामुळे नागरिकांची खरेदी क्षमता वाढली आहे.
परतावा प्रक्रिया झाली सोपी
व्यवसाय सुलभतेला चालना दिल्याने कर परतावा प्रक्रिया सोपी झाली आहे. कर भरणं आणि परतावा मिळवणं आता पूर्वीपेक्षा सहज झालं आहे. या सुधारणांमुळे देशाच्या आर्थिक वाढीला गती मिळाली आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
Leave a Reply