गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सतत चढउतार पाहायला मिळत आहे. त्यातच आता सोन्याचे दर झपाट्याने घसरताना दिसत आहेत. आजही सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. एकीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत आहे, तर दुसरीकडे सोन्याचे भाव कोसळत आहेत. सोन्याचे भाव वधारतील, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडले. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, सोने आणि चांदीच्या किंमती ज्या प्रकारे घसरत आहेत, त्याला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प कारणीभूत आहेत का? २०२६ हे वर्ष सोने आणि चांदीसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
युद्ध सुरू होण्यापूर्वी सोने दोन लाखांच्या जवळ
इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याचे भाव जवळपास दोन लाखांच्या आसपास गेले होते. मात्र, या युद्धाला सुरुवात झाली आणि सोने आणि चांदीचे भाव धाडधाड कोसळले. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. जानेवारी महिन्यात १० ग्रॅम सोन्याची किंमत १.७५ लाख रुपयांच्या वर होती. त्यावेळी ही किंमत दोन लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता ही किंमत १.२५ लाख रुपयांच्या दिशेने जात असल्याचे दिसते. चांदीची स्थिती तर अधिकच वाईट आहे.
ट्रम्प यांच्यामुळे घसरण, असा सवाल का?
मध्यंतरी सोन्याचे दर वधारले होते. मात्र, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठे हल्ले सुरू करणार असल्याची घोषणा केली की, पुन्हा सोन्याचे दर कोसळताना दिसले. अमेरिकेत महागाई वाढली आहे आणि ती लवकर कमी होईल, असे वाटत नाही. परिणामी, लोक असे म्हणत आहेत की ट्रम्प यांच्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत. अमेरिकेत वाढलेल्या महागाईनेच सोने आणि चांदीच्या किंमती कमी झाल्याचे सांगितले जाते.
सोने आणि चांदीच्या किंमती कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. जेव्हा बाजारात एखाद्या वस्तूचा तुटवडा असतो, परंतु खरेदीदार मात्र अनेक असतात, तेव्हा खरेदीदार ती वस्तू अधिक किंमतीत विकत घेण्यास तयार होतात आणि त्या वस्तूची किंमत वाढते. भारत सरकारने ग्राहकांनी अधिकचे सोने खरेदी करू नये, याकरिता ड्यूटीत मोठी वाढ केली. तरीही भारतात सोन्याची मागणी वाढत आहे. तज्ज्ञांनी मोठा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवसांत अजून सोने घसरण्याचा अंदाज आहे.
Leave a Reply