सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत चढ-उतार सुरू होते. आता मात्र सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
## तोळ्यामागे २,७८० रुपयांची घट
सोन्याच्या किमतीत प्रति तोळा २ हजार ७८० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सणासुदीला किंवा लग्नकार्यासाठी दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
## काही महिन्यांपूर्वी दर १.५ लाखांवर
काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम १ लाख ५० हजार रुपयांचा आकडा पार केला होता. सोन्याचे दर सतत वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले होते. मात्र, आता दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे.
## चांदीही स्वस्त
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदी १०० ग्रॅममागे ५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना आता थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Leave a Reply