उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या कार्याबद्दल भावनिक शब्दांत आदर व्यक्त केला. राजकारणापलीकडे जाऊन अजितदादांनी नातं जपण्याचं काम केल्याचं शिंदे म्हणाले. अजित पवार यांच्या विकासकार्याला त्यांनी आदरांजली वाहिली.
पुणे जिल्ह्याच्या विकासातील योगदान
पुणे जिल्ह्याच्या विकासात अजित पवार यांचं मोठं योगदान असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. सहकार क्षेत्रातही त्यांचं काम महत्त्वाचं राहिलं, असं शिंदे यांचं म्हणणं आहे.
कुटुंबासोबत उभे राहण्याची ग्वाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजितदादांना पाठबळ दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या संकल्पना पुढे नेण्याची आणि त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.
Leave a Reply