युनाइटेड अरब अमिरात (युएई) मध्ये काम करणाऱ्या सर्व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना २ आणि ३ डिसेंबर रोजी सुट्टी मिळणार आहे. ही पगारी सुट्टी असून, सुट्टीच्या बदल्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतेही पैसे कापले जाणार नाहीत. ५५ वा युनियन डे अर्थात ईद अल एतिहाद २०२६ च्या निमित्ताने सरकारने ही घोषणा केली आहे. नागरिकांना राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
घोषणा कशी करण्यात आली?
युएईच्या मानव संसाधन आणि व्यवस्थापन मंत्रालयाकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही सुट्टी देशातील सर्व प्रकारच्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली असून, २ डिसेंबर आणि ३ डिसेंबर रोजी सुट्टी असणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची सुट्टी
खासगी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली असताना सरकारी कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. २ डिसेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. त्यानंतर लगेच विकेंड असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टी मिळणार आहे. सरकारी कार्यालये थेट ७ डिसेंबर रोजी पुन्हा सुरू होणार आहेत. सुट्टी जाहीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे देशातील जवळपास सर्वच कामकाज या काळात ठप्प राहण्याची शक्यता आहे.
Leave a Reply