सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पॅट-१ चाचणीचे सुधारित वेळापत्रक; २ ते ५ डिसेंबरला परीक्षा

संकलित मूल्यांकन चाचणी (पॅट) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे.

पॅट-१ चाचणीचे सुधारित वेळापत्रक; २ ते ५ डिसेंबरला परीक्षा

दिवाळीची सुट्टी संपताच नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात होणारी संकलित मूल्यांकन चाचणी (पॅट) आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध झाल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुटीनंतर लगेच परीक्षेचा ताण येण्याऐवजी विद्यार्थ्यांना तयारीसाठी काही दिवस मिळणार आहेत.

कधी कोणती चाचणी?

परिषदेच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रथम भाषेची चाचणी २ डिसेंबर, गणिताची चाचणी ३ डिसेंबर आणि तृतीय भाषेची चाचणी ५ डिसेंबरला होणार आहे. ही परीक्षा दहा माध्यमांमध्ये घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील उणिवा ओळखून अध्यापन प्रक्रियेत सुधारणा करणे, हा या चाचणीचा मुख्य उद्देश आहे. प्रथम सत्रातील अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत क्षमतांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाययोजना आखण्यावरही भर दिला जाणार आहे.

प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्याचे निर्देश

संकलित चाचणीच्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत विद्यार्थीनिहाय उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्येक शाळेने प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत याबाबत सक्त निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद नाशिकच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी दिली आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance