खासदार संजय राऊत यांचा वाढदिवस त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महाराष्ट्रभरातून आलेले कार्यकर्ते सकाळपासूनच निवासस्थानाबाहेर जमले होते.
वाढदिवसानिमित्त राऊत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आणलेले विविध केक त्यांनी या ठिकाणी कापले. पुष्पगुच्छ देत आणि केक कापत उपस्थित समर्थकांनी राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थितांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
समर्थकांनी व्यक्त केलं प्रेम
राऊत यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्यावरील प्रेम या निमित्ताने व्यक्त केलं. राजकीय वर्तुळात नेहमी सक्रिय असणाऱ्या संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या या गर्दीतून त्यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली, असं सांगण्यात येत आहे.
Leave a Reply