सात वर्षे मेहनतीने जपलेली संत्र्याची बाग शेतकऱ्याने स्वतःच उद्ध्वस्त केली आहे. हिरवीगार झाडं तोडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. पाण्याअभावी बाग जगवणं अशक्य झाल्याने शेतकऱ्याला हा कठोर निर्णय घ्यावा लागला.
पाण्याअभावी बागांवर जेसीबी
पाण्याच्या कमतरतेमुळे संत्रा आणि केळीच्या बागांवर जेसीबी फिरवावी लागली आहे. वर्षानुवर्षे जपलेली झाडं डोळ्यांदेखत पडताना पाहणं शेतकऱ्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरलं.
दुष्काळाने स्वप्नांची राखरांगोळी
दुष्काळाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. बागांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. पाण्याअभावी बाग उद्ध्वस्त करण्याशिवाय शेतकऱ्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही.
Leave a Reply