हवेची गुणवत्ता घसरल्याने फुप्फुसांची पुरती दमछाक होत आहे. फटाक्यांमुळे भाजलेल्या रुग्णांसह दमा आणि अस्थम्याच्या रुग्णांची डॉक्टरांकडे धाव सुरू झाली आहे. प्रदूषित हवेमुळे श्वास घेण्यास त्रास होत असून, अनेकांना आरोग्याच्या गंभीर समस्या भेडसावत आहेत. बदलत्या हवामानाबरोबरच वाढते प्रदूषण हे फुप्फुसांच्या आरोग्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
दम्याच्या रुग्णांना वाढता त्रास
दम्याचा त्रास वाढणे, सीओपीडी रुग्णांची प्रकृती बिघडणे आणि फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रदूषित हवेत दीर्घकाळ राहिल्याने फुप्फुसांच्या कर्करोगाचाही धोका वाढू शकतो. त्यामुळे श्वासाच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्रास वाढल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला देण्यात येत आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी काय आवश्यक
बांधकामांतील धूळ नियंत्रणात ठेवणे, वाहनांचे उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ हवा राखणे आवश्यक आहे. प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. नागरिकांनीही स्वच्छ हवेसाठी जबाबदारीने वागणे गरजेचे असून, प्रदूषण वाढवणाऱ्या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.
Leave a Reply