रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

विलिनीकरण राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न : सचिन अहिर

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शिवसेना नेते सचिन अहिर यांचे सूचक विधान. मोदी बारामतीला अमित शाह पुण्यात येत आहेत; या भेटींमधून त्यांना ताकद मिळेल, असे ते म्हणाले.

विलिनीकरण राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न : सचिन अहिर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विषय संपल्याचे नेत्यांकडून सांगितले जात असतानाच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. विलिनीकरण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगतानाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याचा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे भेटीचा उल्लेख केला आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. पण असे असले तरी दोन्ही गटांच्या वतीने विलिनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम लागल्याचे म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी असा प्रस्ताव आलेला नसून, दादा होता तेव्हा विलिनीकरण निश्चित होणार होते, पण आता तो विषय संपला असल्याचे जाहीर केले आहे. त्याशिवाय अजित पवार गटाच्या नेत्यांनीही आम्ही फक्त आधीच्या झालेल्या गोष्टींवर विधान केली आहेत, कधी काय बोलायचे हा आमच्या राजकारणाचा भाग असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

दोन तासांच्या बैठकीत केवळ कामकाजावर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये विलिनीकरणावर काही चर्चा होणार का याकडे लक्ष लागले होते. परंतु या बैठकीत केवळ कामकाजाबद्दल चर्चा झाल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच जर विलिनीकरणाचा काही विषय असेल, तर त्याची माहिती आम्हाला दिल्याशिवाय पक्षांचे विलिनीकरण होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. विलिनीकरण आम्हाला विचारल्याशिवाय होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

अहिर यांचे सूचक विधान

त्यानंतर आता महायुतीतील महत्त्वाचे नेते शिवसेनेचे सचिन अहिर यांनी नवे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, विलीनीकरण हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते परिसीमनाबाबत काय भूमिका मांडतात ते पाहा, त्यांच्यात विसंगती आहे. मोदी बारामतीला येणार आहेत, चर्चा होईल. अमित शाह पुण्याला येत आहेत, दोन्ही गोष्टी पाहा, त्यांना ताकद मिळेल, असे वक्तव्य अहिर यांनी केले आहे. त्याचवेळी सुळे यांनी विलीनीकरणाबाबत संभ्रम दूर करावा. परिसीमनाला अनेक खासदार आहेत. लोकसंख्या जास्त आणि निधी कमी असल्यामुळे ते गरजेचे आहे. शिवसेनेची भूमिका विलिनीकरणाबाबत काहीच नाही. एकनाथ शिंदे यांना विचारतील तेव्हा ते भूमिका मांडतील, असे अहिर म्हणाले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance