रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

छावा संघटनेची जळगाव महानगर-तालुका कार्यकारिणी जाहीर

छावा मराठा युवा महासंघाची जळगाव महानगर व तालुका कार्यकारिणी जाहीर झाली. महानगराध्यक्षपदी उज्ज्वल पाटील, तर तालुकाध्यक्षपदी डॉ. राकेश पाटील यांची नियुक्ती झाली.

छावा संघटनेची जळगाव महानगर-तालुका कार्यकारिणी जाहीर

छावा मराठा युवा महासंघाच्या जळगाव महानगर आणि जळगाव तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. महानगराध्यक्षपदी मेहरूण येथील सामाजिक कार्यकर्ते उज्ज्वल पाटील, तर तालुकाध्यक्षपदी ममुराबाद येथील पशुवैद्यकीय व्यावसायिक डॉ. राकेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी नियुक्त्यांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांना दिले होते. त्यानुसार कोल्हे यांनी जळगाव महानगर आणि जळगाव तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली.

जळगाव महानगर कार्यकारिणी

महानगराध्यक्ष उज्ज्वल पाटील यांच्यासह महानगर उपाध्यक्षपदी सतीश पाटील आणि संजय सांगळे, महानगर सचिवपदी हितेंद्र टेकावडे, कायदेविषयक सल्लागारपदी ॲड. विक्रम महाले, तर सहसचिवपदी नंदू बडगुजर, जयंत गोंधळी, चंद्रशेखर महाले आणि यशोदीप धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली. सक्रिय सदस्य म्हणून मनोहर बडगुजर, कल्पेश वाणी, कृष्णा जमदाडे, सागर मोतीराळे, भीमराव सोनवणे, आनंद महीरे, राजू कोळी आणि सागर कुटुंबळे यांचा समावेश आहे.

जळगाव तालुका कार्यकारिणी

तालुकाध्यक्ष डॉ. राकेश पाटील यांच्यासह उपाध्यक्षपदी गणेश तायडे आणि डॉ. ललित कोतवाल, सचिवपदी मयूर जावळे, तर सहसचिवपदी आचल भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली. सक्रिय सदस्य म्हणून डॉ. किरण तायडे, डॉ. विशाल साळुंखे, डॉ. नीरज सोनवणे, सचिन पाटील, तन्मय राणे आणि निरंजन पाटील यांचा समावेश आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance