धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे असलेल्या ऐतिहासिक सुवर्णगिरी किल्ल्यावर दिवाळी पर्वाचे औचित्य साधत शिवप्रताप दिन उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा करण्यात आला.
## प्रतापगडावरील शौर्याचे स्मरण
१० नोव्हेंबर १६५९ रोजी किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेल्या शौर्याचे आणि पराक्रमाचे स्मरण करत उपस्थित शिवप्रेमींनी इतिहासाला उजाळा दिला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘हर हर महादेव’च्या गगनभेदी घोषणांनी किल्ला परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमात किल्ल्यावर नवीन भगवा ध्वज आणण्यात आला. त्यानंतर शिवप्रतिमेचे विधिवत पूजन करून दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. दीपावलीच्या आनंदासोबतच शिवप्रेमींनी हा उपक्रम राबविला.
हा उपक्रम ईश्वर पाटील, दिनेश ठाकूर आणि अनिल पवार यांच्या पुढाकाराने झाला. यावेळी शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव, संजय पाटील, गोकुळ पाटील, संदीप पवार, नितीन पाटील, दीपक देवरे, दत्तात्रय पाटील, मयूर पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply