कोरेगाव येथील नगरपंचायतीतील विविध विभागांत कार्यरत असलेल्या सुमारे ८५ कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अधिक आनंददायी झाली. प्रत्येक कर्मचाऱ्याला एकत्रित २८ हजार रुपये, मागील थकीत दोन पगार, दिवाळी साहित्य किट आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मिळाले.
दिवाळीमुळे यंदा नगरपंचायतीने कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये बोनस आणि मागील थकीत दोन पगार दिल्याने कर्मचारी आनंदले. यासाठी नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्षा राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक आणि मुख्याधिकारी प्रताप कोळी यांनी योगदान दिले.
## नगरसेवकांकडून रोख भेट आणि किराणा किट
नगरपंचायतीचा बोनस मिळाल्याने कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देत दयानंद भोसले यांनी निमंत्रण देऊन प्रत्येकी ११ हजार रुपये रोख आणि दीपावली किराणा साहित्याचे किट भेट दिले. या वेळी नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, अक्षय सतीश बर्गे, अक्षय संजय बर्गे, सयाजीराव बर्गे आणि दिनेश सणस उपस्थित होते.
## आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांकडून भेट
येथील हुतात्मा स्मारकात आमदार महेश शिंदे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी संयुक्तपणे नगरपंचायत कर्मचाऱ्यांना निमंत्रण देऊन तब्बल १२ हजार रुपये दिवाळी भेट, पाच ग्रॅम चांदीचे नाणे आणि स्नेहभोजन दिले. या वेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, नगराध्यक्षा बर्गे, आजी-माजी नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते. या अनोख्या भेटीमुळे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply