घरात सोनं बाळगण्याच्या मर्यादेबाबत आणि त्याच्या कायदेशीर स्रोताबाबत सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलं आहे. ठराविक प्रमाणात सोनं बाळगण्याची परवानगी असली, तरी त्या सोन्याचा कायदेशीर स्रोत काय आहे, हे सिद्ध करणं प्रत्येकासाठी बंधनकारक असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे विवाहित महिलांसह सर्वसामान्यांकडे असलेल्या सोन्याच्या हिशेबाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
परवानगी आणि स्रोत या दोन वेगळ्या बाबी
सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं की, सोनं बाळगण्याची परवानगी आणि त्या सोन्याचा कायदेशीर स्रोत सिद्ध करणं या दोन वेगळ्या बाबी आहेत. एखाद्याकडे ठराविक प्रमाणात सोनं असणं याचा अर्थ त्याचा स्रोत आपोआप सिद्ध होतो, असं नाही. सोनं कुठून आलं, हे दाखवण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीचीच असते.
५०० ग्रॅमच्या मर्यादेबाबत काय?
विवाहित महिलांकडे ५०० ग्रॅमपर्यंत सोनं असण्याबाबतही या निकालात चर्चा झाली आहे. मर्यादेत सोनं बाळगता येत असलं, तरी त्याचा स्रोत सिद्ध करावा लागतो, हेच कोर्टानं अधोरेखित केलं आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी करताना त्याची पावती आणि कागदपत्रं जपून ठेवणं महत्त्वाचं ठरतं.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply