अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर दहा महिने उलटले असले तरी या दुर्दैवी घटनेवरून सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबत नाही. आता तर त्यांच्याच पक्षातून मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
शिंदेसेनेनंतर आता थेट राष्ट्रवादीतच अजित पवार यांच्या मृत्यूबाबत संशयाचा धूर निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी अजित पवार यांचा अपघात नव्हे, तर घातपात झाल्याचा दावा केला आहे.
तपासावर कुटुंबीयांनीही घेतला होता आक्षेप
अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासावर पवार कुटुंबीयांनीही आक्षेप घेतला होता. त्यानंतर तटकरेंवरील आरोपांची चर्चा सुरू असतानाच आता पक्षातल्याच नेत्यांनी घातपाताचा दावा केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
दावा प्रेमापोटी की राजकारणापोटी?
उमेश पाटील यांचा हा दावा अजित पवार यांच्यावरील प्रेमापोटी आहे की तटकरेंना अडचणीत आणण्यासाठी, यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. या दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाचीही चर्चा रंगली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply