अनेकांना रात्री झोपेत वेगवेगळी स्वप्नं पडतात. कधी सुंदर, तर कधी भीतीदायक स्वप्नांमुळे अचानक जाग येते. मात्र काही लोकांना वारंवार स्वप्नात साप दिसतो. कधी साप पाठलाग करताना दिसतो, तर कधी तो शांतपणे एका जागी बसलेला दिसतो. अशा स्वप्नांमुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यता
वारंवार स्वप्नात साप दिसण्यामागे नेमका काय अर्थ असू शकतो, याबद्दल धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यतांनुसार काही वेगवेगळे अर्थ सांगितले जातात. काही मान्यतांनुसार स्वप्नात साप दिसणं हे जीवनातील बदलाचं प्रतीक मानलं जातं.
बदलाचं प्रतीक
साप आपली कात टाकतो, त्यामुळे त्याला नव्या सुरुवातीशी आणि परिवर्तनाशी जोडलं जातं. स्वप्नातील साप हा जीवनात मोठा बदल होण्याचे संकेत देतो, असं काही मान्यतांमध्ये सांगितलं जातं. मात्र या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply